बिर्याणी


 बिर्या

बिर्याणी प्रामुख्याने भारतीय उपखंडात बनवला जाणारा एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. प्रामुख्याने भात, मसाले व मांस वापरून बनवली जात असलेल्या बिर्याणीचे मूळ मध्य युगात भारतावर राज्य करणाऱ्या मुस्लिम शासकांमध्ये आढळते. बिर्याणी हा फारसी भाषेपासून तयार झालेला एक उर्दू शब्द आहे.


@ shravan masale

हैद्राबादी चिकन दम बिर्याणी


Biryani of Hyderabad

मटन अथवा चिकन वापरून बनवली जात असलेली बिर्याणी भारताच्या अनेक भागात स्थानिक नावांद्वारे ओळखली जाते. उदा: हैद्राबादी बिर्याणी, अवधी बिर्याणी, दिल्ली बिर्याणी, कोलकाता बिर्याणी, मलबार बिर्याणी, इत्यादी. ह्या सर्व बिर्याण्यांमध्ये मूळ घटक सारखेच असले तरी तांदूळाचा प्रकार, मसाल्यांचे मिश्रण व पाकशैलीमध्ये वैविध्य आहे. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी शाकाहारी बिर्याणी देखील बनवली जाते.

Comments

Popular Posts